ताज्या बातम्यामनोरंजन

“अक्षय कुमार जे चित्रपट करतो त्याच्याशी मी…”, स्वरा भास्करचं खळबळजनक वक्तव्य!

मुंबई | Swara Bhaskar – बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. तसंच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. स्वरा ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडिया, बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान स्वरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारबाबत (Akshay Kumar) खळबळजनक विधान केलं आहे.

‘बॉलीवूड सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट असतात का?” असं स्वराला एका मुलाखतीत विचारलं असता त्यावर स्वरा म्हणाली, “आमचं काम लोकांना कथा ऐकवायचं, दाखवायचं आणि ते आम्ही प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. मला वाटतं आपण कोणीही बॉलिवूडला प्रचार करण्याचे माध्यम बनवायला नको. बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या विचारांची लोकं कामं करतात, वेगवेगळया पद्धतीने व्यक्त होतात आणि हीच बॉलीवूडची खासियत आहे. अक्षय कुमार ज्या पद्धतीचे चित्रपट करतो त्याच्याशी मी सहमत नाही. पण म्हणून त्याचे चित्रपट अपयशी व्हावेत किंवा त्याने ते प्रदर्शित करू नयेत असा याचा मुळीच अर्थ नाही.”

“लोकशाहीत लोकांना त्यांचे राजकीय विचार समोर आणता आले पाहिजेत. पूर्वी लोकांना वाटायचं, स्वरा ही समस्या आहे. आपण जे ग्रुपिझम करतोय त्याने कुणाचेही भले होणार नाही. गोष्ट फक्त एवढीच आहे की, मी रांगेत दुसऱ्यांच्या पुढे आहे”, असंही स्वरा म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये