ताज्या बातम्यामनोरंजन

…म्हणून स्वप्निल जोशीनं ‘चला हवा येऊ द्या’मधून घेतली एक्झिट

मुंबई | Swwapnil Joshi – ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमतील प्रत्येक कलाकारानं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या दरम्यान अभिनेता स्वप्निल जोशीनं (Swwapnil Joshi) चला हवा येऊ द्या मधून एक्झिट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं परिक्षण स्वप्निल जोशी करत आहे. पण आता त्यानं या कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले असून त्यानं या कार्यक्रमातून एक्झिट का घेतली, असा प्रश्न सर्वांना पडला होता. याचंच कारण आता समोर आलं आहे.

या कार्यक्रमामुळे स्वप्निल जोशीला इतर कामं घेता येत नव्हती. त्यामुळे आता स्वप्रिलनं ती कामं करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून निरोप घेतला आहे. तो या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान, लवकरच स्वप्निलचा ‘वाळवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये