कॅबिनेट संपताच मुख्यमंत्री ठाकरे भावूक; चूक झाली असेल तर..

मुंबई : (CM Uddhav Thackeray On Cabinet Matting) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बुधवार दि. २९ रोजी पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती. अद्याप बहुमताची चाचणी प्रलंबित आहे.
दरम्यान, त्याआधीच ठाकरे सरकारने मोठे निर्णय जाहीर केले आहेत. नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर झाले असून यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मंजूर झाली आहे. तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण होणार केल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध विभागातील मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी, पाणी पुरवठा, नगरविकास, परिवहन अशा विभागांचा सामावेश आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक संपल्यानंतर मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे. याशिवाय माझ्याच लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्या खात्याचे विषय राहिले ते पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.