क्राईमताज्या बातम्यामुंबई

‘पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर; मुंबईतील धक्कादायक घटना!

मुंबई | स्त्रियांचे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडण्याचे प्रमाण जसजसे वाढत आहे तसतसे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढत होत आहे. अशातच मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘तुला पीएफ मिळवून देतो, माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर,’ अशा आशयाचा मेसेज 24 वर्षीय तरुणीला एका कंपनीच्या व्यवस्थापकाने पाठवला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील एका कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुणी एका गरीब कुटुंबातील असून, घरकाम करून 19 वर्षांचा भाऊ आणि 75 वर्षीय आजीची काळजी घेते. तिच्या आईने घटस्फोट घेतल्यानंतर ती कुटुंबापासूनही विभक्त झाली. तरुणीचे वडील 2009 ते 2015 दरम्यान माझगाव येथील एका कंपनीत काम करत होते. ती 15 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या पगारातून कापलेल्या ईपीएफची रक्कम तिला नॉमिनी म्हणून 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार होती. त्यानुसार 18 वर्षांची झाल्यावर तिने वांद्रे येथील ईपीएफ कार्यालयात ईपीएफचा दावा करण्यासाठी फॉर्म भरला. मात्र, पाच वर्षे पीएफ ऑफिसकडे पाठपुरावा करूनही तिला अजूनही देणी मिळालेली नाहीत.

तरुणीने खेरवाडी पोलिस ठाण्यात सुशांत याच्या असभ्य संभाषणाच्या स्क्रीनशॉटसह तक्रार दाखल केली. त्यानुसार सुशांत सर याच्याविरुद्ध कलम 509 बी (इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे लैंगिक छळ), माहिती तंत्रज्ञान कायदा 67 ए (लैंगिक कृत्ये असलेली सामग्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

‘वडिलांची फाइल कंपनीचे व्यवस्थापक सुशांत यांना पाठवली आहे. ईपीएफची रक्कम 45 दिवसांत तुला मिळेल,’ असे ईपीएफ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये तरुणीला कळवले. मात्र, तीन महिने उलटूनही ईपीएफ न मिळाल्याने तिने सुशांत याच्याशी संपर्क साधला. ईपीएफ रक्कम मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्याकडे तिने दुर्लक्ष केले. परंतु, यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिने ईपीएफसाठी पाठपुरावा केला तेव्हा त्याने शरीर सुखाची मागणी करणारे मेसेज पाठवण्यास सुरुवात केल्याचे तिने ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये