क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश
कुस्तीपटू विरेंदर सिंहही पद्मश्री करणार परत; सचिन, नीरजला टॅग करत विचारलं मत
WFI Election Virender Singh : भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर निराश झालेली भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर ब्रिजभूषण यांच्या विरूद्ध आंदोलनात समर्थ साथ देणाऱ्या बजरंग पुनियाने देखील आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. आता भारताचा कुस्तीपटू विरेंदर सिंहने देखील पद्मश्री परत करण्याची तयारी दर्शवली आहे. याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत त्यांनाही या प्रकरणी आपला निर्णय देण्याचे आवाहन केलं.