ताज्या बातम्यापुणे

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार ते मतदान पार पडेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी; रासनेंनंतर या उमेदवारांवर झाले गुन्हे दाखल

पुणे | कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. निवडणुकीचा प्रचार ते मतदान पार पडेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर आले. निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेमंत रासने मतदान केंद्रात जाताना भाजपचं उपरणं घालून गेल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अन् रासने यांच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील आणि भाजपचे गणेश बिडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आरोप करीत उपोषण केलं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पैसे वाटप केल्याच्या आरोपानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या प्रकरणी काँग्रेच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र आता गणेश बिडकर यांच्यासह तिघांवर आदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये