इतरक्राईमताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

श्रद्धा वालकरच्या हत्येपेक्षाही भयंकर घटना, सुप्रसिद्ध माॅडलचे फ्रीजमध्ये दयनीय अवस्थेत आढळले अवयव

हाँगकाँग | Model Abby Choi – श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walker Murder Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरला होता. अशातच, आता श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षाही भयंकर घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका सुप्रसिद्ध 28 वर्षीय मॉडेलची हत्या झाली आहे. या माॅडेलचं नाव अॅबी चोई (Model Abby Choi) असं आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉडेल अॅबी चोई बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे एका घरातील फ्रीजमध्ये सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Model Abby Choi Murder)

एका घरातीलं फ्रीजमध्ये ठेवलेल्या सूप पॉटमध्ये अॅबी चोईचं डोकं तरंगताना आढळलं आहे. तसंच तिचं धडही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या घरात अॅबीचं डोकं सापडलं, ते घर तिच्या पूर्वाश्रमीच्या सासऱ्यांनी भाड्यानं घेतलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅबीच्या शरीराच्या अवयवांसह मांस कापण्याचं मशीन आणि कपडे सापडले आहेत. तिचं धड आणि इतर अवयव गायब होते, तर तिचं डोकं फ्रिजमधील सूप पॉटमध्ये आढळलं. याप्रकरणी पोलिसांनी अॅबीचा पूर्वाश्रमीचा पती अॅलेक्स क्वांग, सासरा क्वांग काऊ आणि एक नातेवाईक अँथनी क्वांग यांना अटक केली आहे.

वृत्तानुसार, अॅबीनं आतापर्यंत अनेक मॉडेलिंग असाइनमेंट केल्या होत्या. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. तसंच तिनं पहिल्या घटस्फोटानंतर चेन रेस्टॉरंटच्या संस्थापकाचा मुलगा ख्रिस टॅमशी दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे ती पूर्वीच्या सासरच्या मंडळींच्या नावानं विकत घेतलेली मालमत्ता विकण्याच्या तयारीत होती. त्यामुळेच त्या लोकांनीच तिचा खून केल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये