एकाच वेळी तब्बल एवढ्या…पोलिसांच्या निलंबनाची पहिलीच वेळ

नागपुर : मागील काही दिवसांपासून राज्यातील पोलिस दलांसदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यात, नागपूरच्या पोलिस दलाचीही कायम चर्चा असते. कायदा सुवस्थेचे तीनतेरा उडाल्याच्या नकारात्मक बातमीमुळे तर, कधी पोलिसांच्या बदलीबाबत उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे नागपुर संदर्भात नेहमी बोललं जातं. सध्या नागपूरच्या पोलिस दलाची एक वेगळी बातमी समोर येत आहे. येथील पोलिस दलातील तब्बल 17 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. एकाच वेळी एवढ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आजारी असल्याच्या कारणाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुट्टीवर असलेल्या आणि वारंवार सूचना देऊनही कर्तव्यावर रुजू न झालेल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोणतेही ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल 17 पोलिसांना नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. एकाच वेळी 17 पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर पोलिस दल चर्चेत आले आहे.