क्रीडापुणेसिटी अपडेट्स

पूर्वा, मधुमिता उपान्त्यपूर्व फेरीत

पुणे : महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे आणि मधुमिता नारायण यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मधुमिताने केरळच्या मेघना एस.वर १९-२१, २१-९, २१-१३ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, मधुमिताची दुसऱ्या फेरीत मध्य प्रदेशच्या ऐश्वर्या मेहताविरुद्ध लढत होती. मधुमिताने पहिली गेम २१-१२ अशी गमावली होती, तर दुसऱ्या गेममध्ये ती १५-१०ने पुढे असताना ऐश्वर्याने दुखापतीमुळे माघार घेतली. तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वेने गुजरातच्या श्रेया लेलेवर १५-२१, २१-१९, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तत्पूर्वी, पूर्वाने दुसऱ्या फेरीत तमिळनाडूच्या प्रणवी एन.वर २१-१८, २१-१६ अशी मात केली होती. तेलंगणच्या अभिलाषाने तारा शहाला पुढे चाल दिली.

दुसऱ्या फेरीचे निकाल – पुरुष एकेरी – कौशल धर्मामेर (महाराष्ट्र) वि. वि. तलर ला (अरुणाचल प्रदेश) २१-१५, २१-१०, अभिषेक सैनी (हरयाणा) वि. वि. कौशिक सी. एस. (तमिळनाडू) २१-१७, २१-१४, प्रणव राव गंधम (तेलंगण) वि. वि. डॅनिएल फरिद एस. (कर्नाटक) २१-१७, २१-११, तुकुम ला (अरुणाचल प्रदेश) वि. वि. मनराजसिंग (हरयाणा) २१-१३, २१-१९, जगदीश के. (आंध्र प्रदेश) वि. वि. कार्तिक जिंदाल (हरयाणा) २१-१८, २१-१२, तरुण एम. (तेलंगण) वि. वि. अरुणेश एच. (तमिळनाडू) २१-१९, २१-१४, कनिष्क एम. (तेलंगण) वि. वि. अभिषेक येलिगर (कर्नाटक) २१-१२, २१-१९, मुनेवार महंमद (केरळ) वि. वि. प्रणय कट्टा (राजस्थान) १३-२१, २१-१६, २१-१७, बोधित जोशी (उत्तराखंड) वि. वि. पृथ्वी रॉय के. (कर्नाटक) २३-२१, २१-१३, हर्षल दाणी (महाराष्ट्र) वि. वि. हेमंत एम. जी. (कर्नाटक) २१-१५, २१-१९, रोहन गुरबानी (महाराष्ट्र) वि. वि. ध्रुव कुमार (दिल्ली) २१-९, २१-१०, हर्षल भोयार (मध्य प्रदेश) वि. वि. श्रीकर राजेश (कर्नाटक) २१-१७, ११-२१, २१-८.

महिला एकेरी – मालविका बनसोड (महाराष्ट्र) वि. वि. मिहिका भार्गव (मध्य प्रदेश) २१-१७, २१-१८, मेघना रेड्डी (तेलंगण) वि. वि. रिया हब्बू (महाराष्ट्र) २१-७, २१-१०, साद धर्माधिकारी (महाराष्ट्र) वि. वि. अनुरा प्रभुदेसाई (गोवा) २१-३, ९-२१, २२-२०, श्रुती मुंदडा (महाराष्ट्र) वि. वि. दीपशिखा सिंग (दिल्ली) २१-७, २१-९.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये