ताज्या बातम्यामनोरंजन

आज केएल राहुल आणि अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाचा मंडप सजला आहे. 21 जानेवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. रविवारी संगीत कार्यक्रम पार पडला आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अथिया आणि केएल राहुल संध्याकाळी चार वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागणार आहे.

अथिया (Athiya Shetty) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नानंतर त्यांचे ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड तसेच क्रिकेट विश्वातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी नेतेमंडळी आणि उद्योगपती अथिया-केएल राहुलच्या ग्रॅंड रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. या रिपेप्शनला 3000 पाहुणे उपस्थित राहु शकत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये