शिवसेनेनंतर आता ‘या’ कारणामुळं महाविकास आघाडीत पडणार उभी फुट?

मुंबई : (Sharad Pawar On Shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या पंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळं कधीही न भरुन निघणारं राजकीय नुकसान सेनेचं झालं आहे. आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. या बंडाचं मुळ कारण स्थापन केलेली महाविकास आघाडी असल्याच बंडखोरांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या देशात राष्ट्रपतीपदाचे निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. युपीए कडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आहे. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी दि. ६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्यानं बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराला गती देण्याची चर्चा झाली. देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ट्विट शरद पवार यांनी केलं.
तर, दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी पाठोपाठ खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना इतर खासदारांना मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निर्देश द्यायला सांगितले. यासंदर्भात शेवाळे यांच्यावतीने पत्रही सादर करण्यात आले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का, असा प्रश्न चर्चेला जात आहे. शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत. त्यामुळं त्यांच्या मतांकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.