ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अखेर पोटातलं ओठावर! शिंदे गटाच्या ‘त्या’ गौप्यस्फोटामुळे; फडणवीस तोंडावर पडले

मुंबई : (Tanaji Sawant On Devendra Fadnavis) मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. शिंदे गट आणि इतर पक्षाताल नेते वारंवार काही ना काही गौप्यस्फोट करत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 सालचा सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी घडवून आणला असल्याचं सावंतांनी म्हटलं आहे.

तानाजी सावंत म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी शिंदे-फडणवीस व मी आमदारांचे काॅन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे. शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचा काही हात नसल्याचा सांगणारे फडणवीस यामुळे चांगलेच तोंडावर पडले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस किती खरे बोलतात, अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

पुढे सावंत म्हणाले, 2019 महाविकास आघाडी सरकारमध्ये मला मंत्रीपदावरून डावल्यामुळे मी धाराशिव (Dharashiv) जिल्हापरिषदमध्ये भाजपबरोबर सत्ता स्थापन करून पहिलं बंड पुकारलं. मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हे सरकार बदल केल्याशिवाय शांत राहणार नाही. परत मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचंही मातोश्रीवर जाऊन सांगून आल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

2019 साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप-शिवसेनेला (BJP-Shivsena) लोकांनी बहुमत दिलं. आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जाणते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला असल्याचं सावंत यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये