पुणेसिटी अपडेट्स

शिक्षकांनी केले व्याजासह मुद्दलही गायब

अहमदनगर : ज्ञानाचे धडे गिरवणार्‍या गुरुजींवर प्रेम करणार्‍या चाहत्यांची समाजात काही कमी नसते, आई – वडिलांनंतरचे दुसरे प्रेम हे गुरुजनांवर व्यक्त केले जाते, याचाच फायदा उठवत काही गुरुजींनी पैसे दामदुप्पट करून देण्याचा बहाणा रचत अनेकांकडून ठेवीच्या रुपातून मोठ्या आर्थिक रकमा जमा करून अनेकांना गंडा घातलेला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती अहमदनगर, औरंगाबादसह राज्यात पसरवून आपले उखळ गुरुजींनी पांढरे करून घेतलेले आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून शाळा बंद असल्या तरी गुरुजींना पगार चालू असतानाही गुरुजींनी या कुटिरोद्योगाची व्यूहरचना आखत आर्थिक teacher corruptionघोटाळा केल्यामुळे गुरुजींच्या कृष्णकृत्याची दोन महिन्यांपूर्वी पहिली फिर्याद नेवासा पोलिस ठाण्यात दाखल झालेली होती.

यामध्ये दोन गुरुजींना जेलची हवादेखील खायला मिळालेली असून पोलिस कोठडीतही गुरुजींना बसण्याचा दुर्दैवी बाका प्रसंगही आलेला आहे. या आर्थिक घोटाळ्यातील इतर काही पाठीराखेही पोलिस रडारवर आहेत. त्यामुळे “लोका सांगे तत्त्वज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण” असल्याचे दाखवून दिल्यामुळे गुरुजींचा खरा बुरखा समाजासमोर आल्यामुळे सर्वसामान्य माणूस मात्र अवाक् झालेला आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, भानसहिवरे (ता. नेवासा) येथील प्रसाद नंदकिशोर भणगे यांना भाळवणी (ता. पारनेर) येथील वैभव अनंत चेमटे याच्यासह अन्य पाच जणांनी रेडिमिन्टस कन्सल्टन्सी प्रा. लि., या कंपनीत पैसे गुंतविल्यास दोन वर्षांत पैसे दामदुप्पट करून देण्याचे गाजर दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी फसवणूक करणारा गुरुजी वैभव चेमटे याला भाळवणी येथून चौकशीकामी ताब्यात घेऊन फसवणूक करणार्‍या गुरुजीच्या मुसक्या आवळून अटक केलेली होती. या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून पोलिस तपासही सुरू आहे.
यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी चेमटे याची पोलिस तपासात चौकशी केली असता इतरही प्रतिष्ठितांना दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून फसविल्याच्या घटना समोर येण्याची शक्यता पोलिस तपासात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी चेमटे याला अटक करून तपासाची चक्रे फिरविली गेलेली होती.


आर्थिक घोटाळा हा गुरुजींना पैसे दामदुप्पट करून देण्याचा बहाणा करून फसवणूक केल्यामुळे गुरुजींवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणार्‍या मंडळींचे व्याजासह मुद्दलही गायब झाले असून या प्रकरणात अनेकांना गंडा घालणार्‍या गुरुजींवर कायद्याचा फास आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये