तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा रेड कार्पेटवर धमाकेदार लुक

मुंबई | ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) केवळ तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) ‘बिग बॉस 15’पासून (Bigg Boss 15) एकमेकांना डेट करत आहेत. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते आहे. जेव्हाही ही जोडी एकत्र दिसते, तेव्हा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा त्यांच्या केमिस्ट्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता पुन्हा एकदा तेजस्वी आणि करणची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान ही जोडी पुन्हा आपल्या ग्लैमरस लुक मध्ये पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या व्हिडीओ ची चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी प्रकाश लाल रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय मोहक अंदाजात दिसून येत आहे. त्याचबरोबर कारण कुंद्रा हा गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या या लुकचे कौतुक केले जात आहे.