दहावीचा निकाल लागला, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के!

मुंबई – SSC Result 2022 | महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल घोषित करण्यात आला आहे. दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली असून 12210 शाळांचा निकाल 100% लागला आहे. गेल्यावर्षी पेक्षा 3% नी निकाल कमी लागला आहे.
विभागानुसार लागलेली टक्केवारी पुढीलप्रमाणे- पुणे- 96.96 %, नागपूर 97%, औरंगाबाद 96.33%, मुंबई 96.94%, कोल्हापूर 98.50, अमरावती 96.81, नाशिक 95.90%, लातूर 97.27% आणि कोकण 99.27 %
महाराष्ट्रतून 54159 पुनर्निरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 52351 प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले असून पैकी 41.390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची टक्केवारी 79.06 % आहे.
दरम्यान, राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी पुरविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 5 लाख 70 हजार 27 प्राथम श्रेणीत तर 2 लाख 58 हजार 27 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 42 हजार 170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.