ताज्या बातम्यामनोरंजन

“‘त्या’ जागेने मला आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या”; अभिनेता गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | Actor Gaurav More | छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajtra) हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे हास्यसम्राट आणि अभिनेता गौरव मोरे(Gaurav More). गौरवला नुकतंच भीमरत्न पुरस्काराने (Bhimratn Award) सन्मानित करण्यात आलं. तसंच त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Actor Gaurav More)

गौरवने या मुलाखतीत त्याच्या आभिनयाच्या आवडीबद्दलही सांगितले आहे. “माझा या इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नाही. पण मला अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपट आणि चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. मला माहितीये मी एखाद्या हिरो सारखा दिसत नाही किंवा माझा एखाद्या कलाकारासारखा खास चेहरा देखील नाही, पण मला लोकांचं मनोरंजन करायचं होतं. त्यामुळे मी विनोदी क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि खूप मेहनतीनंतर आणि प्रयत्नानंतर मला हास्यजत्रेमध्ये काम मिळालं. मी कधीकाळी फक्त १०० रुपयांवर दिवस काढलेत. माझ्याकडे प्रवासासाठी पैसे नसायचे. ऑडिशन देण्यासाठी पैसे नसायचे. माझ्याकडे फोन नव्हता. कितीतरी वेळाने मी तो छोटासा बटण असणारा फोन घेतला,” असं गौरव म्हणाला.

पुढे गौरव त्याच्या आयुष्याबद्दल सांगताना म्हणाला, “मी मुंबईच्या झोपडपट्टी भागात वाढलोय. पवई फिल्टरपाडा या भागात माझं आजवरचं आयुष्य गेलं. त्या जागेने मला आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. आयुष्यातली मूल्य शिकवली आणि यामुळेच मी ती जागा कधीही विसरू शकत नाही. आता तर लोकं मला त्याचं जागेच्या नावाने ओळखतात. ती जागा माझ्या आठवणींचा एक भाग आहे. मी अशा ठिकाणी वाढलोय याचा मला अभिमान आहे. लोकप्रियता मिळाल्यावर अनेकजण त्यांचं पूर्वायुष्य विसरून जातात. ते कुठून आलेत याचा त्यांना विसर पडतो, पण मी तसं करणार नाही. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी कुठून आलोय त्या जागेच मूळ कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने मला खूप काही दिलंय आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये