पिंपरी चिंचवडसिटी अपडेट्स

आळंदीत प्रशासन भाविकांच्या स्वागतास सज्ज

आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढ पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षा नंतर आळंदीत होत आहे. यासाठी राज्य व परिसरातून वारकरी भाविक अलंकापुरीत दाखल होत आहे. मंगळवारी (दि. २१ जून) सायंकाळी चारच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होण्यास सोहळा सुरु होईल.

आळंदी : भाविक, वारकरी यांच्यासह नागरिकांना या सोहळा काळात नागरी सेवा सुविधा देण्यासाठी आळंदी नगरपरिषद, आरोग्य सेवा, महसूल, पोलीस प्रशासन, आळंदी देवस्थान, आळंदी ग्रामीण आरोग्य सेवा महावितरण या प्रशासनाची सेवा सुविधा देण्यासाठी तयारी सुरू असून प्रशासनाच्या नियोजन पूर्व आढावा बैठकीत दिलेल्या सूचना प्रमाणे कामे उरकण्यास लगबग असून सोहळ्यातील वारकर्‍यांना सुविधा देण्यास आळंदी सजतेय. विविध विभाग प्रमुख केलेल्या तयारीचा आढावा घेत आहेत. उद्या शनिवारपासून आळंदीत वारकर्‍यांच्या दिंड्या दाखल होण्यास सुरुवात होत आहे.

आषाढी यात्रेसाठी भाविक अलंकापुरीत येण्यास सुरुवात झाली असून आळंदी देखील वारकर्‍यांच्या स्वागतास सज्ज होत असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने पायी वारी पालखी सोहळा करता आला नाही. यावर्षी मात्र राज्य शासनाने वारीला परवानगी दिली आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थानला पाच लाखांवर भाविक येण्याची शक्याता व्यक्त होत आहे. पावसाने विलंब लावल्याने याचा परिणाम सोहळ्यात शेतकरी हा वारकरी असल्याने सहभागी होण्याची इच्छा असताना शेतीची कामे उरकल्यानंतर सोहळ्यास मोठी संख्या पुढे प्रवासात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरक्षा शांतता कायम रहावी यासाठी आळंदी पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शक सुचणे प्रमाणे पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात झाला आहे.

आळंदीत पोलिस बंदोबस्त
२००० पोलीस. एसआरपीएफ कंपनी – १, एनडीआरएफ पथक – २, बीडीडीएस पथक – २, सीसीटीव्ही कॅमेरे २१०, पब्लिक अनाउसिंग सिस्टीम – ५८ अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसीपी प्रेरणा कट्टे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. दिघी पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक दिलीप शिंदे. प्रकाश जाधव. बदाने. भंडारे. शिखरे. विद्यामाने. यांनी वारकर्‍यांना कुठला त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे.

कडेकोट बंदोबस्थ यासाठी ठीक ठिकाणी टेहळणी मनोरे, पोलीस मदत केंद्र उभी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. माऊली मंदिरात व्यवस्थापक माउली वीर यांचे नियंत्रणात प्रमुख विश्वस्त योगेश टिळक, पालखी सोहळा प्रमुख ऍड विकास ढगे पाटील यांचे मार्गदर्शन खाली तयारी सुरू असून पुढील एक दिवसात तयार पूर्ण असेल असे माउली वीर यांनी सांगितले. भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त सुखकर दर्शन होईल याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांच्या तसेच सोहळ्याच्या सुरक्षेसाठीच्या दृष्टीकोणातून प्रस्थान काळात आळंदीत ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पूर्वपरवानगीने ड्रोन वापरण्याची मुभा राहणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वारीसाठी येणारे भाविक हे ग्रामिण भागातील असतात त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नसतो. त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आले तर भाविकांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता नकारता येत नाही, त्यामुळे ड्रोनच्या वापरावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. बेकायदा ड्रोन वापरले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये