देश - विदेश

राष्ट्रीय टपाल दिनाचे बदलते स्वरूप

१३ ऑक्टोबर रोजी ‘अंत्योदय दिवस’

पुणे : राष्ट्रीय टपाल सप्ताह युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची स्थापना सन 1874 मध्ये झाली. त्याच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षी राष्टीय टपाल सप्ताह सप्ताह साजरा होतो. रविवार ९ आक्टोबर रोजी सप्ताहाची सुरुवात झाली.

आर्थिक सक्षमीकरणाबाबत प्रत्येक जिल्ह्यात मेळाव्यांदवारे विविध स्तरांवर मोहिम: बँकिंग, फिलाटेली, विमा इत्यादि साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, टपाल विभागाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध मेलिंग लॉजिस्टिक आणि सप्लाय चेंज मॅनेजमेंट सोलुशन्सची ग्राहकांना माहिती देणारी कस्टमर मीट; आधार नोंदणी/नवीन आधार कार्ड तयार करणे, थेट लाभ योजना, सुकन्या समृद्धी खाती, AePS, इत्यादीसाठी “अंत्योदय दिवसा” मध्ये शिबिरे आयोजित केली जातील.

जनतेच्या जीवनात आणि विविध व्यवसायांच्या संदर्भात टपाल विभागाचे योगदान आणि विभागाच्या भूमिकेसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा जागतिक टपाल दिनाचा उद्देश होता. जनतेला सामाजिक व आर्थिक घडामोडींची जाणीव करून देण्याचे हे एक साधन आहे.

यावर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “पोस्ट फॉर प्लॅनेट’ आहे. याद्वारे राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये टपाल विभागाची भूमिका आणि कार्याबद्दल जागरुकता निर्माण केली जाते. यावर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह काळाच्या बदलत्या गरजांनुसार साजरा केला जाणार आहे.

बँकिंग आणि विम्याद्वारे प्रस्तुत केल्या जाणाऱ्या विविध वित्तीय सेवांद्वारे सामान्य माणसाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी टपाल विभाग दिनांक सोमवारी १० ऑक्टोबर रोजी ‘वित्तीय सशक्तिकरण’ दिवस साजरा होईल. टपाल विभागाचे सर्वसामान्यांच्या जीवनातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय टपाल सप्ताह उपक्रमामध्ये गुरुवारी दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये