ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सर्वभावे दास झालो त्यांचा | मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

मुंबई | सध्या राज्यात पावासाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच दोन वर्षांनंतर सुरू असलेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वारकरी दिंड्यांवर जास्त फोकस करा असा आदेश प्रशासनाला दिला आहे. तसंच यासाठी निधी कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. यामदरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 4 हजार 700 बस सोडण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये