“हा सर्व निर्लज्जपणाचा कळस”; नाना पटोले
!["हा सर्व निर्लज्जपणाचा कळस"; नाना पटोले nana patole 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/nana-patole-1-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. आता राजकीय वातावरण देखील तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंड दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. ५० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि अपक्ष आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणतात की, एकनाथ शिंदेनी काल भाजपाचा अप्रत्यक्षपणे स्वतःहून उल्लेख केला. आसाममध्ये महापूर आला असतानाही त्यांची ‘महाशक्ती’ मात्र बंडखोर आमदारांना सांभाळण्यातच व्यस्त आहे. हा सर्व निर्लज्जपणाचा कळस, असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच भाजपने देखील एक नवा डाव टाकत राज्यपालांना महाराष्ट्रात सध्या सुरु असणाऱ्या राजकारणाबद्दल पत्र दिल आहे.
दरम्यान, सकाळी महाविकास आघाडीची बैठक देखील झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना आव्हान देखील दिल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आणखी तापलं आहे. तर आसामधील गुवाहाटीमध्ये असणारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांना आसाम कॉंग्रेसचे प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी लवकरात लवकर आसाम सोडण्याच आदेश दिला आहे. आसाम हे लोक नैतिकतेला महत्त्व देत. तुमच असं गुवाहाटीमध्ये राहणार राज्याच्या जनतेला चुकीचा संदेश देत असल्याचं भूपेन कुमार बोराह यांनी म्हटलं आहे.