शाळकरी मुलाची थेट मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे मागणी, म्हणाला…

नालंदा :आज मुख्यमंत्री नितीशकुमार हे नालंदाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना सोनू नामक शाळकरी मुलगा भेटला. या प्रसंगी त्याने मुख्यमंत्र्यांना त्याला दर्जेदार शिक्षण पुरवण्याची विनंती केली आहे. सोनू म्हणाला, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मला दर्जेदार शिक्षण पुरवावे. माझ्या वडिलांकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. ते पूर्ण पैसे दारुवर खर्च करतात. मी बालवाडी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यातून मी माझ्या शिक्षणासाठी पैसे कमवतो.
मात्र, माझे वडील माझा पैसा दारुवर खर्च करतात. मुख्यमंत्र्यांनी त्याची विनंती ताबडतोब स्वीकारली आणि अधिकाऱ्यांना त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यास सांगितले. सरकारी शाळा या दर्जेदार शिक्षण पुरवू शकत नाहीत, बिहारमध्ये दर्जेदार शिक्षण सर्वच मुलांना मिळते असे नाही. शिक्षण हे पूर्णपणे मोफत असायला हवे. त्यामुळे मुलगा असो की मुलगी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे सोनू कुमार यावेळी म्हणाला.