ताज्या बातम्यारणधुमाळी

“25 वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीचा अनुभव वेगळा”

मुंबई | Hemant Godse – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व खासदारांनी एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याची मागणी केली आहे. असं नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. काल (11 जुलै) मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार उपस्थित होते तर सहा खासदारांनी दांडी मारली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना स्वीकारण्याच्या मागणीसह नैसर्गिक युती करा, या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं हेमंत गोडसे यांनी सांगितलं.

यावेळी हेमंत गोडसे म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा या संदर्भात चर्चा झाली. सर्व खासदारांनी आपापली भूमिका मांडली. आता उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील.

विकासकामे करायची आहेत. दोन वर्षे उरली आहेत, त्यामुळे नैसर्गिक युती करा. एकनाथ शिंदे यांना स्वीकारा, अशी मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसंच एकनाथ शिंदे यांना पक्षात घेण्यासंदर्भात वारंवार विनंती करणार असल्याचंही हेमंत गोडसे म्हणाले.

दरम्यान, “25 वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीचा आणि अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी अनुभव वेगळा आहे. 25 वर्ष नैसर्गिक युती होती मात्र अडीच वर्षात अनेक प्रकल्प रखडले,” असं देखील हेमंत गोडसे म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये