ताज्या बातम्यामनोरंजन

शासनानं पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांना विचारून निर्णय घ्यावा- डाॅ. नीलम गोऱ्हे

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शिखर समितीच्या बैठकीपूर्वी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व पंढरपूर येथील स्थानिकांना विचारून विकासाबाबत पुढील निर्णय घेण्याची सूचना.

मुंबई | Neelam Gorhe – आगामी पंढरपूर (Pandharpur) आषाढी वारीसाठी बैठकांचे आयोजन सर्व पातळीवर होत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास शिखर समितीच्या बैठकीचे आयोजन मंत्रालय येथे करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी बाहेर देशात असताना देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या दरम्यान पंढरपूर विकासाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी बैठका घेऊन मागणी केलेल्या 73 कोटींचा निधी मंजूर केला होता याची आठवण श्री शिंदे यांना करून दिली. याचा उपयोग नवीन आराखड्यात करून घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

त्याचबरोबर नवीन आराखडा तयार करताना पंढरपूर स्थानिक रहिवाशी यांना विचारून निर्णय घेण्यात यावा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आराखडा मंजुरीच्या मधील सर्व अडथळे दूर करावेत व आराखडा तात्काळ मंजूर करावा. हा आराखडा अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे. महिलांसाठी फिरते रुग्णालय उपलब्ध करून द्यावे. मैला व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अत्यंत नेटके करावे अशी विनंती देखील डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना केली.

image 4

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये