रंगांचे आहारातील महत्त्व!!

आपल्याला माहीत आहे आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की, आपल्या ताटात सगळ्या रंगांचे पदार्थ असणे गरजेचे आहे. असं का म्हणायचे याचा आपण कधी विचार केला आहात का? नाही ना आज थोडं रंगसंगतीबद्दल बोलूया.या रंगांना जीवनात खूप महत्त्व आहे ते आपणास जीवनातील विविध पैलू, तसेच आहारातील रंगांचे महत्त्व शिकवून जाते. एक डॉक्टर म्हणून आज तुमच्यासमोर हे मांडण्याचा प्रयत्न करते.
लाल रंग- लाल रंग जरी दिसायला भडक असला तरी तो आहाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा लाल रंगामध्ये मोडणार्या भाज्या बघितल्या तर टमाटर, बीट, लाल माठ, गाजर इत्यादी या सर्व भाज्या लोहयुक्त असतात. ज्या रुग्णांचे रक्त कमी असते त्यासाठी खूप उपयुक्त असतात.हिरवा रंग – सर्व पालेभाज्यांचा जसे की पालक, मेथी, आंबट चुका, चवळी इत्यादी रंग हिरवा असतो त्यामधून आपल्याला विटामिन E हे जीवनसत्व मिळते. जे प्रत्येकाचं त्वचेसाठी स्नायू साठी गरजेचं असतं.
पांढरा रंग- पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे.
तुम्ही म्हणाल पांढर्या रंगाच्या कोणत्या भाज्या असतात. असतात की, मुळा, पांढरा कांदा, लसूण या सर्व प्रकारांमध्ये कॅल्शियम हे पुरेपूर असते. म्हणून हे आपल्या खाद्यपदार्थात असणे आवश्यक आहे. आज फक्त ढोबळमानाने तीन रंग तुमच्यासमोर मी सांगितले. अशा प्रत्येक रंगाचे आपल्या आहारात खूप महत्त्व आहे. हे सर्व रंग जर आपल्या ताटात असतील तर सगळे जीवनसत्व त्यांच्या शरीरात उतरतात.