‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा अपघात, अभिनेत्रीनं स्वत: ट्विट करत दिली माहिती; म्हणाली, “गंभीर दुखापत…”
मुंबई | Adah Sharma – सध्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट जरी वादात सापडला असला तरी त्यानं बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसंच या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) देखील चर्चेत आहे. सगळीकडे तिच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. यादरम्यान, अदा शर्माचा अपघात (Adah Sharma Accident) झाला आहे. याबाबतची माहिती तिनं स्वत: ट्विट करत चाहत्यांना दिली आहे.
‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि अभिनेत्री अदा शर्मा काल (14 मे) एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. यावेळी त्यांचा अपघात झाला. यासंदर्भात अदा शर्मानं ट्विट करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. “मित्रांनो मी ठिक आहे. आमच्या अपघाताच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेक मेसेज येत आहेत. तर संपूर्ण टीम आणि आम्ही सर्व ठीक आहोत. काहीही गंभीर नाही, पण तुम्ही काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”, असं अदानं म्हटलं आहे.
अदासोबतच दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी देखील ट्विट करत अपघाताबद्दल माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “आज आम्ही करीमनगरमधील एका मेळाव्यात आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण, दुर्दैवानं अपघातामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही. त्यामुळे मी करीमनगरच्या जनतेची मनापासून माफी मागतो. आम्ही आमच्या मुलींना वाचवण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत राहा”.