ताज्या बातम्यामनोरंजन

32 हजार मुलींना ISIS ने बनवलं कैदी; अंगावर शहारे आणणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलरला अल्पावधीतच मिळाले 72 लाख व्ह्यूज

The Kerala Story : सध्या सिनेसृष्टीत सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मितीचा ट्रेंड वाढतोय. आपल्या आजुबाजूला घडलेल्या, घडत असलेल्या एखाद्या घटनेची खरी बाजू, लोकांना माहीत नसलेली बाजू चित्रपटांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच आणखी एक चित्रपट सध्या चर्चेत आहे. द केरळा स्टोरी असं या चित्रपटाचं नावं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या बहुचर्चित सिनेमाच्या ट्रेलरला युट्यूबवर ट्रेडिंगमध्ये आहे. या ट्रेलरला अल्पावधीतच 72 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

‘द केरळ स्टोरी’ कधी प्रदर्शित होणार? (The Kerala Story Release Date)

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदा शर्मा या सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे. शालिनी उन्नीकृष्णनच्या भूमिकेत ती दिसून येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेनने सांभाळली आहे. तर अमृतलाल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये