Top 5देश - विदेश

अंधांना ओळखू येण्यासाठी पंतप्रधानांनी केली ‘ही’ खास नाणी लॉन्च!

नवी दिल्ली- Narendra Modi launches New Coins series | सध्या देशभर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अमृतमहोत्सवी सप्ताहाचे आयोजन केले आहे. याला ‘आयकॉनिक वीक’ (Iconic Week) असं नाव देण्यात आलं आहे.

6 जून पासून 11 जून पर्यंत हा सप्ताह साजरा केला जात आहे. याला त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही नवीन नाण्यांची मालिका जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे ही नाणी अंध व्यक्तीला सुद्धा ओळखता येणार आहेत.

एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांच्या मूल्यांची नाणी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित केली गेली आहेत. या नाण्यांवर आझादी का अमृत महोत्सव (AKAM) डिझाइन असेल, ही नाणी स्मारक नाणी नसून चलनाचाच भाग असणार आहेत.

उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की, “नाण्यांची ही नवीन मालिका लोकांना अमृत काळाच्या ध्येयांची आठवण करून देतील आणि लोकांना देशाच्या विकासासाठी काम करण्यास प्रेरित करतील. ” असं वक्तव्य त्यांनी नाण्यांच्या प्रकाशनाच्या वेळी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये