साथ हवी ती योग्य मार्गदर्शनाचीच !
![साथ हवी ती योग्य मार्गदर्शनाचीच ! salil kulkarni](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/salil-kulkarni-780x470.jpeg)
पुणे : ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम, मारुती भैरवनाथ मंदिर हॉल, वडाचा बसस्टॉप, कर्वेनगर या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध उद्योजक रामदास माने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, तर सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमामध्ये दहावी व बारावीच्या सहा-सहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या वर्षी तीन मुलांना आर्थिक स्वरूपाची देणगी, शिष्यवृत्ती स्वरूपात प्रत्यक्ष जागेवर दिली व प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याला आपल्या ट्रस्टतर्फे एक सॅक देऊन गौरवण्यात आले. वरील कार्यक्रमास कर्वेनगर वारजे परिसरातील इयत्ता दहावी व बारावीचे सर्व गुणवंत विद्यार्थी, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.