धक्कादायक! भीमा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, पोलिसही झाले हैराण

दौंड | Daund Crime – काही दिवसांपूर्वीच दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत (Bhima River) 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सात जणांची आत्महत्या (Suicide) नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कौटुंबिक वादातून या सात जणांची हत्या झालाचं म्हटलं जात आहे. (Daund Crime)
या 7 जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे. अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचं म्हटलं जात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते.
पवार कुटुंब हे मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. 17 जानेवारी रोजी या कुटुंबानं दौंड तालुक्यातील पारगाव इथल्या नदीत आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं होतं. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचं समोर आलं होतं. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.