विचारांचा तिसरा नियम

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर
विचारामध्ये शक्ती असते. हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. “मुख्य विचार पूर्ण करण्यासाठी अनेक पूरक विचार मुख्य विचाराला मदत करीत असतात. यासाठी समान विचारांना मुख्य विचाराकडे आकर्षित करीत असतात. त्यामुळे विचारांची शक्ती अधिक पटीने वाढते. त्यामुळे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरतात.” हा विचारांचा तिसरा नियम आहे.विचारांची निर्मिती आपल्या मेंदूतील प्री फोन्टल कॉर्टेक्स या केंद्रात होत असते. विचार करण्याचे प्री फोन्टल कॉर्टेक्स हे केंद्र मेंदूतील इतर केंद्रांना जोडलेले असते.
त्यामुळेच जसा विचार असतो तसाच मेसेज मेंदूतिल इतर केंद्रांना जातो, त्यामुळे आपण आपल्या विचारानुसार कृती करीत असतो. उदा खेळायला जायचा विचार केला तर खेळायची, वाचन करायचा विचार केला तर वाचण्याची, झोपायचा विचार केला तर झोपण्याची कृती, हा आपला मुख्य विचार आहे. या विचारांना पूर्ण करण्यासाठी अनेक छोटे छोटे विचार मदत करीत असतात. तसेच पुस्तकांची आवड असणारे, वाचन करणारे, पुस्तकावर चर्चा करणारे, वाचण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्यक्ती आपल्या जीवनात येतात. कारण विचाराच्या तिसऱ्या नियमानुसार समान विचार एकमेकांना आकर्षित करीत असतात.
मैदानात जायच्या आधी आपल्याला आळस असतो, परंतु एकदा मैदानात गेलो की, आपण खूप उत्साहाने व्यायाम करतो. मैदानात हा उत्साह तेथे असलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीमधून आपल्यात येतो. आपले विचार तेथील एनर्जीला आकर्षित करतात. याउलट रडक्या, इमोशनल सिरीयल, किंवा सिनेमे आपल्या भावनिक विचाराला आकर्षित करतात. त्यामुळे सिरीयलच्या वातावरणाचा परिणाम म्हणून कुटुंबातील वातावरण भावनिक किंवा गंभीर झालेले आपण पाहतो. कारण त्यांनी आपल्या भावनिक विचारांना आकर्षित केलेले आहे. त्यामुळेच न चुकता अनेक कुटुंबात वेळेवर tv सुरूच होतो.मराठीत ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला’ अशी एक म्हण आहे. ही मन म्हणजे समान विचार एकमेकांना आकर्षित करतात. याचे ज्वलंत उदाहरण आहे. मग आपल्या सभोवतालचे वातावरण कसे आहे? आपण कोणत्या वातावरणात सहभागी व्हावे हे आपल्या हातात असते. आपण आपल्यापेक्षा अधिक उत्साही, कार्यप्रनव, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या सहवासात आलो की, त्यांचे विचार आपल्या विचाराला आकर्षित करतात.