पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा

“द अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२”

पिंपरी : महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा नागरिकांना नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नागरिकांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी सहाय्य करण्यासाठी “द अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” या उपक्रमाद्वारे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून त्याद्वारे सर्व उपक्रमांबाबतची कार्यवाही तसेच प्रगतीची योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नॅशनल अर्बन डिजिटल मिशन हे शेअर्ड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करीत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन नागरी सेवांची उपलब्धता, निवड आणि वापर या संदर्भात संपूर्ण देशभरातील नागरिकांचा दृष्टीकोन समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू आहे.

अर्बन फ्रेमवर्क आऊटकम्स २०२२ च्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी व सकारात्मक परिणाम करणाऱ्या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महानगरपालिका सात्यत्याने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिकेमार्फत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा, पाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण, शिक्षण, स्थापत्य, उद्यान, वैद्यकीय, पर्यावरण, हॉकर्स झोनबद्दल सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये