देश - विदेश

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा पाणी प्रश्न सुटणार

पुणे : पुणे महापालिकेमधे समाविष्ट झालेल्या ३४ गावांना पाणी पुरवठा ३० जूनपर्यंत करण्यात येणार आहे. आता पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून पाउलं उचलण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसंच पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यामध्ये थेट पाइपने पाणी पुरवठा सर्वांत आधी सूस, म्हाळुंगे आणि बालेवाडी या तीन गावांना करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेत समाविष्ट गावांना महापालिका पाणी पुरवठा करत नसल्याने पालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले होते की, जोपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत या गावांना महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा करावा. त्यामुळे महापालिकेने या योजनेच्या कामाला जोरदार सुरवात केली आहे.अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. त्यामध्ये तीन ते चार गावांचा एक गट तयार करून त्यानुसार एक स्वतंत्र आराखडा तयार गेला जात आहे.

यातील पहिला आराखडा सुस, म्हाळुंगे आणि बालेवाडीचा करण्यात आला असून, येणाऱ्या आठवड्याभरात हा अहवाल मिळणार आहे. तसंच ऑक्टोबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून थेट कामाला सुरुवात होऊ शकेल. ही ३४ गावं शहराच्या आजूबाजूने आहेत. तसंच पुणे महापालिकेने पाणी पुरवठ्याच्या टाक्यांसह इतर सुविधांसाठी आरक्षणे लवकरात लवकर टाकावीत अशी सूचना पीएमआरडीएला केली आहे. जर जागा उपलब्ध झाली तरच टाक्या उभारण्यासाठी जागा मिळेल नाहीतर पुन्हा टाक्यांसाठी जागा शोधावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये