राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भात अजित पवार, क्रीडा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांत महत्वाची बैठक

पुणे : गुजरात मध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अजित पवार आणि क्रिडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्यासह राज्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबिरे जी मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद येथे सुरू आहेत, त्या संदर्भात योग्य नियोजन करण्यासंदर्भात आणि संघ पाठवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. याबरोबरच बालेवाडी मध्ये उपलब्ध सुविधांच्या बाबतीत सुद्धा डॉ. सुहास दिवसे यांनी सविस्तर माहिती दिली.
संघाचे प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून जेथून महाराष्ट्राचे सर्व संघ गुजरातला रवाना होतील. यावेळी नामदेव शिरगावकर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणीस यांनी सांगितले की, “केरळ मध्ये मध्ये झालेल्या गेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे, यावर्षी सुद्धा महाराष्ट्राचा संघ चांगली कामगिरी करून भरघोस पदके जिंकून महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर लौकिक करेल.”
यावेळी सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक सुहास पाटील, अनिल चोरमुले, नवनाथ फडतरे, उदय जोशी, सहाय्यक संचालक उदय पवार हे सुद्धा उपस्थित होते.