…म्हणून उपमुख्यंमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा दौरा केला रद्द
पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या विविध शैलींमुळे जनतेला आपलेसे करतात. याचा आजही प्रत्यय आला. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील आजचा दौरा रद्द करत, संवेदनशीलता पुन्हा एकदा दाखवली आहे. एकेकाळचे त्यांचे खंदे समर्थक, मात्र सध्या भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात दाखल आहेत. म्हणून अजित पवार यांनी शहरातील विकास कामांच्या उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर दौऱ्याच्या वेळेत ते थेट रुग्णालयात पोहचले. जगतापांच्या तब्येतीची विचारपूस केली.
अजित पवारांचा शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात दौरा ठरला होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्धी पत्रकाराद्वारे गुरुवारीच कळवलं होतं. त्यानुसार शनिवारी सकाळी सात ते साडे नऊ असा अडीच तासांचा वेळ त्यांनी पिंपरी चिंचवडला दिला होता. सगळी तयारीही झाली होती. पण शुक्रवारच्या सायंकाळी अचानकपणे हा दौरा रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कळवलं. पण पुण्यातील पुढचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार होता. त्यामुळं पिंपरी चिंचवडचा दौरा रद्द का केला? असा प्रश्न विचारला जात होता. याचं उत्तर स्वतः अजित पवारांनी त्यांच्या कृतीतून दिलं आहे.