अर्थदेश - विदेशमुंबई

हॉटेल, रेस्टॅारंटच्या बिलातील सर्व्हिस चार्जबाबत सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : हॉटेल आणि रेस्टॅारंटमधील सर्व्हिस चार्जबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकारले जात होते, आता त्यामध्ये दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने निर्देश जारी केले आहेत.

या निर्देशांमध्ये कोणत्याही कारणाने हॉटेल किंवा रेस्टॅारंट ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. जेवणाच्या बिलातही ते जोडले जाऊ नये, असे निर्देश प्राधिकरणाने जारी केले आहेत. कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात शुल्क जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.

यासंदर्भात वाढत्या तक्रारींदरम्यान, CCPA ने  काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटलं आहे की, कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. ग्राहक इच्छित असल्यास सेवा शुल्क भरू शकतो. हे पूर्णपणे ऐच्छिक असून ग्राहकांच्या मर्जीने ते घेण्यात यावे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर बिलामध्ये अधिपासून सेवा शुल्क लावण्याबाबत निर्बंध लादले आहेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ग्राहकांना आजपासून सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाहीत. हा ऐच्छिक पर्याय आहे. ते घेणे आवश्यक नाही असं या निर्देशांमध्ये सांगण्यात आलं आहे. अन्न बिलामध्ये आपोआप किंवा डीफॉल्टनुसार सेवा शुल्क जोडता येणार नाही, तसेच इतर कोणत्याही कारणाने सेवा शुल्क वसूल केले जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये