महाराष्ट्ररणधुमाळी

“ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी मदत केली”

जालना : (Santosh Danve On Abdul Sattar) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या एका वक्तव्यामुळं अब्दुल सत्तार चांगलेच आडचणीत सापडले आहेत. ते म्हणाले, आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनी भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी असे संतोष दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान,आज पहाटे राज्यसभा निवडणूकाचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपनं घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आज मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांची नावे घेतली आहेत. या आरोपांनंतर अपक्ष आमदारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.मात्र दुसरीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी यांनी केला आहे. संतोष दानवे हे जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये