देश - विदेश

… हा दहशतवाद्यांचा कट बीएसएफनं उधळला

जम्मू-काश्मीर : मधील सांबा जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सीमेखालून थेट पाकिस्तानात निघणारा एक बोगदा आढळून आल्याचा दावा (बीएसएफ) सीमा सुरक्षा दलानं केला आहे. आगामी अमरनाथ यात्रेत गोंधळ माजवण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचा दावाही बीएसएफकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळं जम्मू भागात अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सांबा जिल्ह्यातील चाक फकीरा बॉर्डर आऊटपोस्टजवळ बुधवारी संध्याकाळी हा क्रॉस बॉर्डर बोगदा १५० मीटर लांब आहे. असं बीएसएफचे डीआयजी एस. पी. एस. सिंधू यांनी म्हटलं आहे.

हा बोगदा पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आला असून तो अलिकडेच खोदण्यात आला आहे. या बोगद्याचं प्रवेशद्वार हे दोन फुटाचं असून त्याच्या भारताच्या बाजूनं बाहेर पडण्याच्या टोकाकडे २१ वाळूची पोती रचण्यात आली आहेत. बाहेर पडताना भगदाड हे बुजवलं जाऊ नये ते मजबूत रहावं यासाठी ही वाळूची पोती रचण्यात आली आहेत. दिवसाच्या गस्ती वेळी हा बोगदा आढळून आली. २२ एप्रिल रोजी जम्मूच्या सुंजवन भागात सीआयएसएफच्या एका बसवर दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या दोघांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला होता. तर एक सहाय्यक सब-इन्स्पेक्टर शहीद झाला होता. या घटनेनंतर हा बोगदा उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये