Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

“यंदा विठूरायाची पूजा फडणवीस करतील”

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिंदेच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. भाजपनेही आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच धागा पकडत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एक भाकित वर्तवलं आहे.

सरकार अस्थिर झालंय की झालं नाही यावर माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं जयकुमार गोरे म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना फडणवीस केव्हा मुख्यमंत्री होतील असा सवाल केला. यावर बोलताना, खूप वेळ नाही. लवकरच आपल्याला बातमी येईल आणि यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील, असं गोरे यांनी सांगितलं.

दरम्यान, येत्या 10 जुलैला सत्ता पालट होणार असून यंदाची आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करणार आहेत, असं आमदार गोरे यांना सुचित करायचं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये