ताज्या बातम्यामहाराष्ट्रशिक्षण

यंदाही मुलांपेक्षा मुलीच सक्सेसफुल, प्रत्येक विभागाचा निकाल पाहा एका क्लिकवर!

आज 2022 चा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ssc च्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वांना पाहता येणार आहे.

तर राज्यात कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. यामध्ये 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसंच सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला. 2020 च्या निकालाच्या तुलनेत 2022 चा निकाल 1.64% ने जास्त लागला आहे. या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर, पुणे अमरावती औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 96.94 %आहे.

दरम्यान, पुणे विभागाचा 96.16, नागपूर 97.00, औरंगाबाद 96.33, मुंबई 96.94, कोल्हापूर 98.50, अमरावती 96.81 नाशिक 95.90, लातूर 97.27,कोकण 99.27 याप्रमाणे निकाल लागला आहे. तसंच यामध्ये एकूण 8169 दिव्य दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 7579 उत्तीर्ण झाले आहेत. तर यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.40% आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यावर्षी मात्र ऑफलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये