मविआ सरकार बरखास्तीच्या दिशेने-संजय राऊत
![मविआ सरकार बरखास्तीच्या दिशेने-संजय राऊत Sanjay Raut 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Sanjay-Raut-1.jpg)
मुंबई : (Sanjay Raut on Eknath Shinde) विधानपरिषदेच्या निवडणुकीची धूळ खाली बसण्याआधीच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदेंनी जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिलं आहे. या सर्व गोष्टींवर सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, शिंदे यांचे हे पर्यायानं महाविकास आघाडीलाच आव्हान आहे. बच्चू कडू, शंभूराज पाटील, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटिल यांच्यासारखे मंत्रीही या बंडात सहभागी झाले आहेत. सूरतमधून या सर्वांना पोलीस संरक्षणात आसामच्या गुवाहटीत नेण्यात आल आहे. यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं टेन्शन आणखी वाढलं आहे.
पुढे राऊत म्हणाले, मी सकाळीचं एकनाथ शिंदेंना फोन कॉल केल्याचं सांगितलं. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली. भाजपला सत्ता स्थापन करावंसं वाटत असेल, तर त्यांनी उतावळं होऊ नये. यामुळे ठाकरे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असं वाटलं तर राखेतून फिनिक्सप्रमाणे भरारी मारण्याचा आमचा इतिहास आहे, असं राऊतांनी भाजपला खडसावलं आहे.