पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

‘आई सन्मान दिन’च्या अनोख्या संकल्पनेतून साधणार त्रिवेणी संगम

पुणे : आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची सामाजिक भावना जितकी अधिकांशाने पुढे येईल तितकी एका कृतज्ञ समाजाची निर्मिती होऊ शकते या भावनेने राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी आई सन्मानदिन साजरा केला जात असून, या निमित्ताने कादंबरीचे प्रकाशन, पुरस्कार आणि संमेलन अशा तीन विधायक कार्यक्रमांना एकत्रित आणण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे.

या त्रिवेणी संगमाची माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक प्रशांत रोकडे यांनी दिली. राष्ट्र साहित्य आकारणी पुरस्कार विजेता डॉक्टर संगीता बर्वे यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होणार आहे. परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवार, दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये