न्युट्रीशियनफिचर

दह्याचे सेवन कधी व कसे करावे?

-जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

दही सर्वांनाच अतिशय आवडते. दही बनवण्यासाठी भारतात म्हशीचे दूध वापरतात. दही करण्यापूर्वी दूध उकळून कोमट होईपर्यंत गार करावे .अर्धा लिटर दुधाला एक चमचा विरजण पुरते ते ताज्या दह्याचा असावे. विरजणावर दह्याचा दर्जा अवलंबून असतो. ते बेताचे आंबट असले तर होणारे दह्याची चवही आंबट गोड वास चांगला असतो दह्याचा शोध कसा लागला? वाळवंटातील उन्हामुळे कातडी पिशवीत ठेवलेल्या दुधाचे दही झाले होते .पण प्राचीन संस्कृत साहित्यात दही हे पूर्ण अन्न म्हणून मान्यता पावले आहे. दह्यात प्रथिने ,जीवनसत्व, खनिजे, कॅल्शियम, रायबोफलेविन ही द्रव्य भरपूर असतात .यातील प्रथिने पचण्यास दुधापेक्षाही हलके असतात. साधे दूध प्याल्यानंतर एक तास तासात ते 32 टक्के पचलेले असते तर दही 91 टक्के पचते म्हणून बेताची पचन शक्ती असणाऱ्यांना तसेच वृद्ध लहान मुले यांना दही चांगले दह्याचे नैसर्गिक फायदे.

दह्यामध्ये असणारे उपयुक्त जंतू म्हणजेच बॅक्टेरिया त्यातील प्रथिनांना समृद्ध बनवतात. आतड्यात गेल्यावर तेथील हानिकारक जंतूंना हे बॅक्टेरिया नष्ट करतात व पचनास आवश्यक अशा बॅक्टेरियांची वाढ करतात. शरीरामध्ये विटामिन, मिनरल्स शोषून घेण्यास मदत करतात. दही घुसळून पाणी घालून त्याचे ताक बनते ते तर आणखीनच पौष्टिक असते. मज्जातंतू निरोगी ठेवते, उन्हाचा ताप कमी करते. दहि व संत्र्याचा रस लिंबाचा रस नसून लावल्यास चेहरा स्वच्छ होतो .त्यामुळे त्वचेला ओलावा व क जीवनसत्व मिळते .

दह्याच्या सेवनाने आतड्यातील दोष दूर होतात. दह्यामध्ये असणाऱ्या लॅक्टिक ऍसिड मुळे दही आंबट बनते यात काही रोगहारक गुणही आहेत .जुलाब, जुनाट बद्धकष्टता, आतड्यातील त्रास दह्यामुळे कमी होतात .पोटात गॅस होऊन होणारी जळजळ दह्याने व इतर अंबवलेल्या फळांच्या रसांनी कमी होते .इतर कोणतेही अन्न अशावेळी पोटात ठरू शकत नाही अशावेळी ताज्या दह्याचे अथवा ताकाचे सेवन फायदेशीर ठरते. चवीला आंबट असणारे दही हे अल्कलीयुक्त अन्न आहे अन्नपचनाला मदत करते. पोटातील वायू व शुष्कता कमी करणे ही कामे दही करते कारण दह्यामुळे पेप्सीन ,रेनिन व हायड्रोक्लोरिक आम्ल हे द्राव अधिक निर्माण होतात .अपेंडायटिस, अमांश, अतिसार रोगात होणारी जळजळ संसर्ग जंतू दह्यातील लॅक्टिक ऍसिडमुळे नष्ट होतात .कोलाइटिस , गॅस्ट्रिक अल्सरमध्ये ताज्या मधुर ताकाचा खूप चांगला परिणाम होतो.

दही दीर्घायुषी बनवते .रोज भरपूर दही खाल्ले तर वृद्धत्व आणि शरीराचा रहास दूर ठेवता येतो .असा जंतू शास्त्रज्ञांचा विश्वास आहे शरीर जसे वृद्ध होते तसे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत जाते .दह्यामुळे शरीर निरोगी ठेवता येईल त्याने आतडी स्वच्छ राखून अकाली वृद्धत्व टाळता येईल.हेपाटाटीस हा कावीळचा तीव्र प्रकार यात शरीरात अमोनिया निर्माण होऊन रोगी कोमात जातो यावर खूप दही खाल्ले तर दह्यातील लॅक्टिक ऍसिड अमोनिया तयार होण्याच्या प्रक्रियेला विरोध करते काविळीत दह्यात किंवा ताकात मध घालून प्यावे.

गुदद्वाराची आग होत असेल तेव्हा सौम्य आहाराबरोबर दह्यात लिंबू पिळून दोन दिवस घ्यावे गुणी येतो त्वचारोग जसे की इसका यावर ताक चांगले ताक बाहेरूनही लावावे. त्वचेवर होणारी आग, खाज , इसब जखमा यांसाठी ताज्या ताकाचे सेवन केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो दह्याचे सेवन आयुर्वेदानुसार दिवसा म्हणजे सूर्य डोक्यावर असेपर्यंत करावे. संध्याकाळी दह्याचे सेवन करणे वर्ज मानले जाते. नाश्त्याची सुरुवात दहि ताक या पदार्थांपासून केल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल तसेच केसांचे व त्वचेचे आरोग्य ही सुधारेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये