आर्थिक आघाडीवर ट्रस पराभूत

खासदारांचा बंडाचा इशारा…
लंडन : ब्रिटनमध्ये पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पदभार सांभाळल्याच्या ३ आठवड्यांनंतर त्या आर्थिक आघाडीवर पराभूत होताना दिसत आहेत. ट्रस सरकारचे मिनी बजेट महागाईवर नियंत्रण मिळवण्यात निष्फळ होताना दिसत आहेत. ट्रस यांना आपल्या पक्षाच्या खासदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. अनेक खासदारांनी वित्तमंत्री क्वासी क्वारटेंग यांना न हटवल्यास पीएमना विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.
ब्रिटिश संसदेचे अधिवेशन ११ ऑक्टोबरला सुरू होईल. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी माजी वित्तमंत्री आणि भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांना परत बोलावण्याचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
वेट अँड वॉच, पक्ष बैठकीकडे दुर्लक्ष पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पार्टी सदस्यांच्या मतदानात पराभूत होणारे ऋषी सुनक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. सुनक यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पक्षाच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. सुनक यांनी सार्वजनिक वक्तव्यांपासून अंतर राखले आहे. सुनक यांनी अखेरचे ट्वीट ८ सप्टेंबरला केले होते. सुनक समर्थकांसोबत रणनीती निश्चित करत आहेत. कारण, सुनक यांच्याकडे ट्रसपेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा आहे. खासदारांच्या अंतिम मतदानात सुनक यांना कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या १३७ तर ट्रसना ११३ खासदारांची मते मिळाली आहेत.
सुनक यांची शक्यता योग्य असल्याचे सिद्ध होते -कर कपात आणि सेंट्रल बँकेकडून कर्ज घेण्याचे ट्रस यांचे धोरण म्हणजे ट्रसनोमिक्स परी कथेसमान आहे. परिणाम: मिनी बजेटमध्येे कर कपात केली, मात्र मध्यम वर्गाला १९ टक्के व श्रीमंतांना ४५ टक्के सूट दिली आहे. सरकारला विदेशी चलन भांडार वाढवावे लागेल. परिणाम: सध्या ब्रिटिश पाउंड डॉलरच्या तुलनेत ५० वर्षांच्या किमान पातळीवर पोहोचला. सेंट्रल बँकेला देणे चुकवावे लागत आहे.
ब्रिटनमध्ये राजकारण तापले…
एक ट्रस यांच्याविरुद्ध कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचेच खासदार अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. याची शक्यता जास्त, कारण सुनक यांच्याकडे जास्त खासदार आहेत. २ ब्रिटनच्या संसदेत प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टीही अविश्वास प्रस्ताव आणू शकते. लेबर पार्टीची लोकप्रियता ट्रस पीएम झाल्यानंतर १७ टक्के वाढली आहे.