ताज्या बातम्यारणधुमाळी

‘संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न…’; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकरावर निशाणा

मुंबई | Devendra Fadanvis And Sambhaji Raje | गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभा उमदेवारीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात असतानाच आता ऐनवेळी (Kolhapur) कोल्हापूरच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजेंच्या समर्थकांकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आधी शरद पवारांनी (Sharad Pawar) हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचीत त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये