रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम!

Tu Jhoothi Main Makkar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत असलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलेल्या रणबीर व श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
सिनेमातील श्रद्धा आणि रणबीर यांच्यातील रोमांटिक केमिस्ट्री आणि विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 15.73 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने जवळपास 10.34 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 10.52 कोटी पर्यंच मजल मारली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसांत 36 कोटी रुपयांचा गल्ला पार केला. तर चौथ्या दिवशी सिनेमाने जवळपास 13 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. चार दिवसांत ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने जवळपास 45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.