ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“तुम्हारा G20, मेरा T20…”, नामांतराच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील यांचा थेट सरकारला इशारा

मुंबई | Imtiyaz Jaleel – नुकतंच केंद्र सरकारनं औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तसंच G-20 परिषदेच्या (G-20 Conference) बैठकीदरम्यान ते आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. यादरम्यान आता त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे प्रशासन अलर्ट झालं आहे.

मुंबईत एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्यामुळे इम्तियाज जलील मुंबईत होते. हे अधिवेशन संपताच जलील यांनी ट्विट करत सरकारला थेट इशारा दिला आहे. “तुम्हारा G20, मेरा T20 … जर भाजप खेळ खेळू शकते, तर ते मी पण करु शकतो…” असा इशारा जलील यांनी दिला आहे. तसंच सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात G-20 परिषदेच्या बैठका होत असल्यानं वेगवेगळ्या देशातील विदेशी पाहुणे शहरात आलेले आहेत. त्यामुळे अशावेळी जलील यांचा आंदोलन करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी हे ट्विट करताच पोलिसांनी याची दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता जलील यांच्यासह शहरातील एमआयएमच्या महत्वाच्या नेत्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये