“…त्यामुळे नोटांवर गांधींचा फोटो नसायलाच पाहिजे”; महात्मा गांधीजींच्या नातवाचे स्पष्ट मत
!["...त्यामुळे नोटांवर गांधींचा फोटो नसायलाच पाहिजे"; महात्मा गांधीजींच्या नातवाचे स्पष्ट मत tushar gandhi 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/02/tushar-gandhi-1.jpg)
नवी दिल्ली : Tushar gandhi On Gandhi’s Image On Indian Currency Notes – महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवर नसायला पाहिजे असं मत गांधीजींचे नातू प्रसिद्ध लेखक तुषार गांधी (Tushar gandhi) यांनी व्यक्त केले आहे. गांधीजींची तत्वे आणि नोटांचा होत असलेला वापर यांत खूप विरोधाभास आहे. पैशाचा फायदा श्रीमंतांना होतो, गरिबांना नव्हे. त्यामुळे नोटेवर गांधी नसावेत असं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. डोंबिवलीत (Tushar Gnadhi In Dombivali) एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात माध्यमांशी ते बोलत होते.
तुषार गांधी यांनी भारत जोडो यात्रेबाबतही (Bharat Jodo Yatra) वक्तव्य केलं आहे. भारत जोडो यात्रा आवश्यक होती. यातून लोकांना जोडण्याचा चांगला संदेश देशाला गेला. मात्र, या यात्रेचा फायदा कॉंग्रेस पक्ष (Indian National Congress) कसा घेईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .’ असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी आरबीआय ने डिजिटल करन्सी लॉंच केली. मात्र, त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यात आलेला नसल्याने तुषार गांधी यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती. ज्याप्रकारे डिजिटल करन्सीवर गांधीजींचा फोटो नाही . तसेच आरबीआयने चलनात असलेल्या नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा असं त्यांनी म्हटलं होतं.