ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आता माघार नाहीच! राज्यपालांविरोधात उदयनराजे आक्रमक, ३ डिसेंबरला रायगडावर आक्रोश मेळावा

पुणे : (Udayanraje Bhosale On Bhagat Singh Koshyari) शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले येत्या ३ डिसेंबरला जनआक्रोश मेळावा घेणार आहेत.

ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाकडून अवमानाची दखल घेतली जात नसेल तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ३ डिसेंबर नंतर भेटून याबाबत गाऱ्हाणे मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी जाहीर केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र दुसरीकडे महाराजांच्याबद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही. तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल मग महाराजांचे नाव का घेता? असा उद्विग्न सवाल देखील भोसले यांनी राजकीय पक्षांना केला.

सर्व पक्षप्रमुखांनी आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचे आवाहन करत, शासनाच्या वतीने महाराजांचा इतिहास अधिकृतपणे अद्यापही मांडण्यात आलेला नाही. तो मांडायला हवा. भाजपचे नाव न घेता राज्यपालांवर कारवाई करणार नसाल तर महराजांचे नाव घेऊ नका, अशा शब्दांत भाजपला भोसले यांनी इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये