उदयपुर हत्याकांडातील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात; पोलिसांचा रस्त्यावरील थराराचा पहा व्हिडीओ

उदयपुर- Udayapur Murder Case : मंगळवारी राजस्थान मधील उदयपुर मध्ये दोन हल्लेखोरांनी एक शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या दुकानात घुसून हत्या केली होती. त्यासाबंधित अल्लेखोरांनी एक व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर शेअर केला होता. या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आज त्या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हत्त्येनंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोर दुचाकीवरून पळून जात होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. पोलीस आणि हल्लेखोरांत झालेल्या चकमकीचा थरार कॅमेरात कैद झालेला आहे.
कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उदयपुरमधील त्याच्या कपडे शिवण्याच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन व्यक्तींनी कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. आणि कन्हैयालाल यांच्यावर तलवारीने वर केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांकडून सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कन्हैयालाल यांनी नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं असल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास एनआयएकडे सोपवण्यात आलेला आहे.
हल्लेखोर दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तेथून पाल काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. रस्त्यात हल्लेखोरांना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात ओपिलीसांनी यश आल. तेव्हाचा थरार एका कॅमेरात कैद झालेला व्हिडीओ कॉंग्रेसचे सोशल मिडिया को-ओर्डीनेटर नितीन अग्रवाल यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.