“धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर, उद्धव ठाकरेंची दोनचं शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : (Uddhav Thackeray Instagram Viral Post) काल रात्री उशिरा केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काही काळासाठी गोठवल्याचे निर्देश देण्यात आले. या आदेशामुळे उद्धव ठाकरेंना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नसल्याचा जो शिंदे गटाचा प्लॅन आहे यामुळे पुर्ण झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी धक्कादायक असून या निर्णयाविराधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी देखील दर्शवण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तळात आणि सामान्य जनतेमध्ये एकच खळबळ माजली आहे.
या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी इंस्टाग्रामवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’ अशी दोनच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आता शिवसैनिकांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “चिन्ह गोठवलंय पण, रक्त पेटवलंय” यामुळे आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.